एक प्रवास..
एक प्रवास, एक अनुभव
खूप काही शिकवून जातो
कोण आपलं, कोण परकं
सगळं सगळं सांगून जातो ..
शब्दांचा खेळ सारा
त्यांचा तरी काय दोष ?
मांडतात डाव ते ही
भावनांवर का धरावा रोष ?
खेळतात एक खेळी,
पडतात उलटे फासे ..
संसाराच्या सारीपाटावर
जिंकतात खोटे दिलासे!
हार होते मनाची
होते आशेची लाखोली
बघता बघता स्वप्नांची
माळ जाते विखुरली !
एक एक क्षण
जणू मोती जसा पडावा
आयुष्याच्या हा डाव
आता कसा सावरावा
घे पुन्हा मोठी झेप ..
उठ म्हणते मान
जुगारून जुने मळभ
साद घालते नवे स्पंदन !!