Monday, 28 August 2023

नातं

                                                                         नातं 


वही आणि लेखणीचं नातंच खुप गोड आहे. निरपेक्ष, निर्विवाद, निःशंक आणि निस्वार्थी. त्या दोघांच्या एकमेकांकडून फार अपेक्षा नसतात. अपेक्षा नसल्यावर अतिशय समाधानी आणि सुखद जगता येतं. जगण्याचा खरा आनंद घेता येतो. निखळ वाहणारा झरा खूप काही सांगून जातो. खाचखळग्यातून वाट कशी काढावी  हे शिकवून जातो. मी कधीच हे शिकू शकले नाही. न धरून ठेवता आले, न सोडून देता आले. एखाद्या चिंधी सारखं. चिंधीचं असच असतं. ज्या कारणासाठी तिला तिच्या कापडाच्या ताग्यातून वेगळं केलेलं असतं, त्याच कारणाची गरज संपली कि, तिची हि गरज संपते. मग त्या एवढ्याश्या चिंधीचा भार वाटू लागतो.


कधी कधी तर मला असं वाटतं कि पिसं लावून उडून जावं. म्हणजे झेप घ्यावी असे नाही. भरारी, उडी, झेप हे आणि यासारखे शब्द मला आता प्रेरणा देत नाहीत. आधीसारखे. आता मला खुणावते ते स्वच्छंद, मोकळे, खुले आकाश. "आभाळ" या शब्दापेक्षा "आकाश" हा शब्द मनाला अतीव भिडतो. आकाश हे शुभ्र, स्वच्छ आणि ताजे वाटते. पण आभाळाचं तसं नसतं. आभाळाचं ओझं वाटतं. ढग अगदी खाली येऊन, काळजावर घाव केल्याचा भास होतो. मनाचे खेळ सारे ... दुसरे काय?


खरं म्हणजे ढग हा धरणीला भिजवण्यासाठी खाली उतरून येतो. तो साथ द्यायला आलेला असतो. घात करण्याचं त्याच्या मनातही नसतं. शेवटी तो हि त्याचं आभाळ सोडूनच आलेला असतो न? धरणीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी! एखाद्याने अपेक्षा पूर्ण केल्यावर किंवा करताना शाब्बासकीची थाप खूप काही करून जाते. त्याला नवे बळ देते, नवी उम्मेद देते, एक आशा पल्लवित करते. पण हे नेहमीच होते असे नाही. कधीतरी, निराळेच घडते. आपल्याला वाटते कि आज सगळंच कसं छान आहे, सगळं निर्विघन, स्वच्छ, मोकळं आहे. पण घडतं मात्र भलतंच. बघता बघता आपल्याला आशा, आकान्गशांवर पाणी फिरतं आणि सगळंच मातीमोल ठरतं. आपण दिलेला वेळ, केलेले कष्ट, उराशी बाळगलेल्या आशा, जीव ओतून काम करताना झालेली जखम. जेव्हा आपल्या आनंदाच्या आशेच्या ओघात ती जखम जाणवलेलीच नसते. तिची ठिणगी आपल्याला खूप लहान, सूक्ष्म आणि क्षुल्लक वाटते. पण तेच निराशेचे पाणी फिरल्यावर त्या ठिणगीची आग भडकू लागते. विचारांच्या काहुराचा वारा त्या आगीला अजूनच भडकवत असतो. आपण हे सगळं कुणासाठी केलं ? का केलं ? या प्रश्नांची आपण नकळत उत्तरे शोधत बसतो. उत्तरं सापडत नाहीत, प्रश्न पडतच राहतात. निर्धार करावासा वाटतो. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून या जाळ्यातून स्वतःला सहज सोडवता येईल, असेही मला वाटू लागते. मन बरेच काही मनाशीच ठरवते. चंग बांधते, हिशेब आखते. काय काय करते हे मन? इमले बांधते. वास्तवाच्या गलक्यात पुन्हा ते सगळे इमले पडतात. 

तेवढ्यात माझे लक्ष्य एका गोष्टीकडे वेधले जाते. मी निराशेने इतकी काठोकाठ भरलेली असताना. एक चिमणा चिमणीची जोडी मला दिसते. ती घुटमळत असतात. त्यांचं घरटं मोड्लेलं असतं. आणि मला तो whatsapp वर आलेला मेसेज आठवतो, ज्यात चिमणा चिमणीला म्हंटला होता कि, "अगं, चल आपल्याला पुन्हा नवीन घरटे बांधावे लागेल.. मदतीची वाट पाहायला आपण माणसं थोडेच आहोत" आणि मी सगळी निराशा झटकून पुन्हा नव्या उम्मेदीने उभी राहते. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवून जातो, एक महत्वाचा धडा तो आपल्याला देतो आणि तो म्हणजे, "प्रयत्नांती परमेश्वर!" "तू चाल पुढं तुला र गड्या.. भीती कश्याची... पर्वा बी कुणाची ?"

Monday, 21 August 2023

कोरी पाटी ..

कोरी पाटी ..


माझे दुःख त्याला एकाचे नसते, पण त्याचे दुःख सांगायला त्याला माझ्यापाशी बोलावे वाटते. रडायला, मन मोकळे करायला माझा खांदा हवा असतो आणि माझी सोबत हवी असते. त्याला जे बोलायचे असते ते ऐकायला, त्याच्यावर माझे मत द्यायला, चर्चा करायला, सगळ्या सगळ्याला मी हवी असते. मी जरा जास्त बोलते. माझी एक मैत्रीण पण मला बोलते कि, "तू किती बडबडी आहेस ग, जो भेटेल त्याच्याशी बोलत बसतेस"! पण आता तो माझा स्वभावच आहे. मला विस्तारून सांगायला आवडते. मला उलगडून सांगायला आवडते. मला नेमके नाही येत बोलता. घोळून, चवीने, सगळं प्रसंग घडी घडणे उलगडून सांगायला आवडतो. पण त्याला नसतो तास ऐकायचा. त्याला नेमकेपणा आवडतो. बाकी सगळा त्याला फापटपसारा वाटतो. मग सुरु होतो तोच एक खेळ .. उं सावलीचा. ज्या खेळात सध्या ऊन भयंकर आहे. सहन न होण्याइतकं. चूक माझीच आहे. नेहमीप्रमाणे. मला ती मान्य असतेच. मी नाही म्हणतच नाही. नेहमीप्रमाणे. पण टाळी एका हाताने नाही वाजत ना? माझी असेल ८०% चूक तर त्याचीही २०% असेलच ना. अर्थात नवरा बायकोच्या नादात कुठे अशी टक्केवारी काढतो आपण. यावेळी फरक एवढाच आहे कि मला चूक सुधारावी वाटत नाही. मला त्यासाठी प्रयत्न हि करावासा वाटत नाही. तसंही त्याच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या चुका मी सुधारत नाहीच ! मग मी कितीही प्रयत्न केला, तरी त्याचं हे मत बदलणार थोडीच आहे? म्हणून या वेळी मला तो प्रयत्न हि करायचा नाही. मला मनापासून वाटेल, पटेल तेव्हा ती आपोआप सुधारली जाणार आहे. तोवर मला हे भिजत घोंगडं असाच ठेवायचं आहे. आधी मला असे आवडायचे नाही. एक घाव दोन तुकडे करायला आवडायचे. आता सगळ्यातुनच अंग काढून घ्यायचे असे ठरवले आहे. 


सगळे कसे मला मनमोकळे, निवांत, हळू हळू आस्वाद घेत केलेले आवडते. त्याला मात्र परफेक्ट, नेमकेच, विशिष्ठ आणि परिणामांचा विचार करून केलेलं आवडतं. मी नाही करू शकत सारखाच विचार परिणामांचा किंवा नेहमीच नाही विचार कौन बोलू शकत. नेहमी नियोजन नाही करू शकत. तो माझा पिंडच नाही. मला spontaneously  सुचतं आणि तसं जेव्हा सुचतं तेव्हा ते जास्त खुलतं, रुचतं आणि भावतं सुद्धा. मलाच नाही तर इतरांनाही. इतरांना आवडो, न आवडो. मी इतरांसाठी कधीच जगले नाही. मी माझ्यासाठी जगते. आणि त्यात काही वावगं वाटत नाही. अरे मला माझं आयुष्य आहे. मला, माझ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. आणि एकदाच मिळतं. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. मिळालाच तरी मला सगळंच आठवेलच कश्यावरुन? असो.. विनोदाचा भाग वगळता, दुसऱ्याच्या इशाऱ्यावर आपलं आयुष्य जगायला मला आवडतच नाही. मी नेहमी म्हणते, "अरे! मी थोडीच कुणावर अवलंबून आहे? मिंधी आहे? ज्याचा त्याचं मनाचा विचार करण्याचा ठेका मीच घेतलाय का? मी माझं आयुष्य इतरांचा विचार करण्यात का घालवू वाया?" इतरांप्रमाणे का जगू मी ? मी स्वच्छंद आहे. स्वतंत्र आहे. स्वेच्छ आहे. मला नाही येत दुनियादारी. आणि मला ती शिकायची हि नाही. असं वागलं तर असं होईल. तसं वागलं तर तसं होईल. मी माझं वागणं दुनियेसाठी का बदलू? वागणं आपसूक होतं, आपोआप होतं. सहज वागेन. माझी होऊन  राहीन. मला कुणी नसले तरी चालेल. मी अंतर्मुख होईन. माझ्यात झाकेन. आणि मार्ग शोधेन.मला नाही फिकीर. मला तो मार्ग केव्हा सापडेल, सापडेल कि नाही? मला नाही माहित. पण मी चालत राहीन. क्षितिजापर्यंत. दूरवर आभाळाचे छत घेऊन. जमिनीच्या चटईवर. अथांग, अविरत. तो आला तर त्याच्या सोबत. त्याचा हात धरून आनंदाने आणि नाही आला तर त्याच्या शिवाय आणि तरीही आनंदाने! माझा आनंद आता कुणा दुसऱ्यावर अवलंबून नसणारे! तो माझा मला घेता येणारे. माझी पाटी कोरी आहे, फुटकी नाहीये..पुसट आहे.. पूर्णतः पुसलेली नाहीये. जोवर आशेचा अंकुर असतो तोवर पालवी फुटतेच.  

Saturday, 5 August 2023

खिडकी ..

खिडकी ..


खिडकीत बसून गजानआड पाहताना डोळे सर्वत्र भिरभिरतात.. काय शोधात असावे ?

संध्याकाळ कलत  असताना, समोर झाडावर बसून चिवचिव करणारी पाखरं जणू

एकमेकांना काही सांगत होती ..

घरी परतण्याची घाई करत असावीत का ? वाट चुकलेल्या एखाद्याला आपली

वाट पुन्हा सापडावी तसे माझे पाय

माझ्या घरट्या कडे वळले. मन विचारात खूप बुडाले होते, वर तरंगून यायला जरा वेळ लागला.

पण मग बेमालूमपणे इतके उमलून आले, कि मग भिजायची सोया नाही राहिली !


मन किती वेडं असतं नाही? कधी व्यक्त होतं तर कधी अगदीच चिडीचूप असतं.

कोऱ्या पाटीसारखं असतं. आज त्याच पाटीवर खूप गिरवलं होतं, चिरखडलं होतं, निक्षून,


आक्रन्दून लिहिलं होतं ..

एखाद्या शांत तळ्यात खडा टाकल्यावर तरंग उठतात तसच काहीसं झाला होतं.

पावलं थांबलं आणि मनही थांबलं.

आज काही ताळमेळ बसतच नव्हता. माझंच घर मला अनोळखी वाटू लागलं होतं.

आत आल्यावर तर मला असा

भास होत होता कि भिंती, छत, खिडक्या, दारं सगळेच माझ्यावर रुसलेत, तोंड फिरवून बसलेत.


माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत. ते सुद्धा मला हेच सांगत होते कि,

"तू स्वतः साठी कधी वेळ देणारेस?

शेवटचं मनमोकळं कधी हसली होतीस? मनासारखं कधी बोलली होतीस?"

पण मग असंही वाटून गेलं की,

आपण सारखा आपलाच विचार करतो का? आपण खूप स्वार्थी आहोत का? प्रश्नांचं काहूर माजलं होतं.

चहाची तलफ आली. बाहेर आभाळ अगदी खाली उतरून आलं होतं.

निळ्या आकाशात आता हळू हळू अंधार दाटायला सुरुवात झाली होती.

चहा करताना पुन्हा समोरच्या खिडकीतून बाहेर नजर गेली. एकदा गमतीत वाटून गेले की, बरे आहे

सगळ्या खोल्यांना खिडक्या आहेत .. त्याच्याने होते असे की बंद खोलीतून

सुद्धा मोकळ्या हवेत असल्या सारखे वाटते.

हळू हळू शांत वाटत होते, सगळा शीण ओसरून जात होतं. चहाचा घोट

घेताना ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. 


समोरच एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. खरं म्हणजे मला या बांधकामामुळे

अतिशय चिडचिड होत असे.

सततचा आवाज, गोंगाट, धूळ सगळंच नको वाटत असे. पण आज माझा त्या सगळ्याकडे

बघण्याच्या दृष्टिकोनच बदलला होता. तिथे काम करणारी माणसं, त्यांच्या बायका,

पोरं सगळे कसे मन लावून,

न थकता काम करत असतील ? आपण किती उगाच दमून जातो नई ? इतके कष्ट करून सुद्धा हसत

खेळात गाणी लावून काम करत असतात ही लोकं. खरंच किती शिकण्यासारखं आहे ह्यांच्या कडून.

आपण मानसिक ताणतणावामुळे स्वतःला इतकं कोंडून घेतला आहे की श्वास घेताना सुद्धा काहीतरी

आत तुटल्या सारखं वाटतं..

आज ही माणसं मला खूप काही शिकवून गेली. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे,

आताच्या क्षणात जगा..

अनुभवा, आनंद घ्या .. कशाला उद्याची बात ??



सौंदर्य

सौंदर्य..

काय असतं ते? कुठल्या रंगात मिसळून तयार केलं जातं का? एका विशिष्ठ आकाराचं असतं का? वेळेवर अवलंबून असतं का? काय असतं नेमकं? माझ्या मते तरी सौंदर्य हे देवाने दिलेलं वरदान आहे, सुंदर विचार, सुंदर मन, निखळ हास्य, निष्पाप हृदय .. ही सौंदर्याची व्याख्या नसू शकते का ? पण समाजात सौंदर्याची व्याख्या खूपच वेगळी आहे.. गोरी कांती, डाग विरहित त्वचा, चवळीच्या शेंगेसारखी अंगकाठी.. हे सगळं साधेपणाच्या निर्मळ प्रतिमेला झाकून टाकतं.. साधेपणा म्हणजे सौंदर्य नाही का ? ताजेपणा म्हणजे सौंदर्य नाही ? या गोरेपणाच्या पांढऱ्या फटक धुक्यासमोर हे सगळं दिसणारच नाही का कुणाला ? असो .. कुणाला दिसावं म्हणून सौंदर्य आपली छाप पाडत नाहीच म्हणा ..! ते असतंच कायम, वाहणाऱ्या झऱ्याच्या स्वच्छतेत असतं, झळकन येणाऱ्या झुळुकेत असतं, खोल विचारांमध्ये बुडालेल्या मनात असतं, वेड्या सारखं केलेल्या प्रेमात असतं .. पानांवर पडलेल्या दवात असतं, ओल्या मातीच्या सुगंधात असतं, खरं तर सौंदर्य सुरकुतलेल्या त्या हातांमध्ये हि असतं .. ज्या हातांनी अपार कष्ट केलेत , त्याच कष्टामुळे आलेले ते सौंदर्य , कुठल्याच मॅनिक्यूर ने नाही येऊ शकणार .. नाही का? काजळ तर काळे असते ... ते हि सौंदर्य खुलवते .. कोळसा हि काळा असतो, तो ही निखारे फुलवतो .. जेव्हा त्या निखाऱ्यांमध्ये एक लाल केशरी छटा उमटते तेव्हा त्याला असीम सौंदर्य लाभते .. हे सगळं बघायला, अनुभवायला ती दृष्टी असणे अत्यंत गरजेचे आहे !!


Saturday, 22 July 2023

एक प्रवास..

 एक प्रवास..


एक प्रवास, एक अनुभव

खूप काही शिकवून जातो 

कोण आपलं, कोण परकं

सगळं सगळं सांगून जातो ..


शब्दांचा खेळ सारा 

त्यांचा तरी काय दोष ?

मांडतात डाव ते ही

भावनांवर का धरावा रोष ?


खेळतात एक खेळी,

पडतात उलटे फासे ..

संसाराच्या सारीपाटावर 

जिंकतात खोटे दिलासे!


हार होते मनाची 

होते आशेची लाखोली 

बघता बघता स्वप्नांची 

माळ जाते  विखुरली !


एक एक क्षण 

जणू मोती जसा पडावा

आयुष्याच्या हा डाव 

आता कसा सावरावा


घे पुन्हा मोठी झेप ..

उठ म्हणते मान 

जुगारून जुने मळभ 

साद घालते नवे स्पंदन !!

Thursday, 29 June 2023

उसी प्याले की प्यास हो !!

उसी प्याले की प्यास हो !!..


प्याले से कब प्यास बुझे ? 

प्याले में एक जाम हो ..

जाम में पैगाम हो,

पैगाम से कब मन भरे ? 

नशे की सौग़ात हो,

नशे में वफ़ा हो...

वफ़ा से कब दिल भरे ?

वफ़ा करने से भी , कोई हमसे खफा हो ..

खफा होने पर हम उसे मनाये 

रूठने मनाने में एक बेमालूम अदा हो !

उस अदा में मेरे खुदा की झलक का अंजाम हो !!

अंजाम से कब रूह सींचे ?

इस रूह को सींचने के लिए ..

उसी प्याले की प्यास हो !!

Saturday, 24 June 2023

एक निर्धार ..

 एक निर्धार ..


एक निर्धार, एकच वणवण 

एक पाऊल मागे घेऊन 

एका सोंगटीचे जीवन ..

एकदाच पाहावे कुणी जगून !


एक चाल,

एक खेळी..

एकच फासा दोनदा फिरवून,

एका डावाचे हे रांजण ..

एकदाच पहावे कुणी पेलून !


एक अधिकार,

एक हक्क ..

एकाच प्याल्यात घ्यावा घोळून,

एका मैफिलीचे हे आंदण ..

एकदाच पाहावे कुणी मागून !


एक माळ,

एक मणी..

एकाच धाग्यात घ्यावा ओवून 

एका दागिन्याचे हे गुंफण 

एकदाच पहावे कुणी लेवून !

Thursday, 18 May 2023

आपुला रुणानुबंध!

 हातावरल्या रेषांनी, 

गृह चंद्र तार्यांनी

आडवाटे वरुन जात असता

अवखळ वादळवार्यांनी

जोडलेला एकभाव, एकमेका, एकसंध.. 

आपुला रुणानुबंध! आपुला रुणानुबंध! 


छोट्या मोठ्या चुकान्नी, 

खट्याळ मिश्किल खुणांनी.. 

ओंजळीतुन निसटत असता

ओथम्बलेल्या क्षाणांनी

मांडलेला एक डाव, एकसारखा, एकबंध

आपुला रुणानुबंध! आपुला रुणानुबंध! 


संकटांच्या चढ़ उतारांनी, 

दिल्या घेतल्या वचनांनी

तुझं माझं करत असता

सहज पाळलेल्या सूचनांनी

आखलेली एक रेशा, एक गाठ, एक धुंध

आपुला रुणानुबंध! आपुला रुणानुबंध! 


Saturday, 1 April 2023

श्वास बोलके झाले ..

 आभाळ शांत होते,

मन हलके झाले 

तुझ्या नि माझ्या एकांतात 

श्वास बोलके झाले ..


सारे निवांत होते,

वारे वाहते झाले,

म्हणता म्हणता विचारांचे..

मनात गलके झाले 


गडद रंग होते,

क्षणात फिके झाले ..

दुःखाचे जाळे फिटता

आभाळ मोकळे झाले !



ऋतू आल्हाद होते,

उन्हात चांदणे नाहले..

संसाराच्या सारीपाटावर,

नशिबाचे गोंदणे झाले !

Sunday, 26 March 2023

मणी सारे वाटेवर ..

मणी  सारे वाटेवर ..

वीज लकाकते आहे,
दिसे सारे क्षणभर ..
सर बरसते आहे 
वाट भिजे वीतभर !

बीज अंकुरते आहे,
कोंब फुटे पळभर ..
वेळ सरकते आहे 
जरा थांब घडीभर !

नभ विव्हळते आहे,
आसू आवर आवर ..
लाट फेसाळते आहे 
उठे मनी ते काहूर !

धार पाझरते आहे,
थेंब साचे पानावर ..
दुःख साकळते आहे 
धुके तरी मनावर !

जाळे पसरते आहे,
वेडी आस वाऱ्यावर 
माळ विखुरते आहे,
मणी सारे वाटेवर .. मणी सारे वाटेवर ...

Monday, 13 March 2023

ऐ मुसाफिर ..

 इन मुस्कानों की खूबसूरती पर

फ़िदा न होना ऐ मुसाफिर ..

बेनकाब उन चेहरों के पीछे ,

टूटे वादे भी बहुत है.. बेनाम जख्म भी  !!


सेह सको तो सेह लेना उस बेवफाई को,

फिर मत कहना, हमने वाकिफ नहीं किया ..

तजुर्बा हम भी रखते है ,

फिर मत कहना उसने घायल कर दिया !

उस बेवफाई के आशिक़ , गुमराह मुसाफिर भी बहुत है.. खोखले जज़बाद भी !


उन मैखानो ने देखे है ऐसे बदनसीब ..

जिनको उन्ही राहों पर पाया गया था !

ठन्डे अंगारे भी बहुत है, .. जलते चाँद भी !!


इसीलिए कहते है,

मत जाओ उन राहों पर..

मोड़ लो अपना रास्ता,

क्युकी पीछे छूटे उन नज़रों पर,

सिरवटें भी बहुत है,.. दरारें भी !!

Thursday, 9 March 2023

अगर..

 


आसमान तो छूना ही था, 

पाव फिर भी ज़मीन पर जमाने ही थे

उड़ान भरने का मज़ा ले पाते

अगर थोड़ी हिम्मत दे दी होती.. 


एहसासों को काबू करना ही था, 

मुश्किलें भी पार कर ही लेते

खुद को आज़माने का मज़ा ले पाते

अगर चार कदम और साथ दी होती.. 


कामयाबी तो हासिल करनी ही थी

कोशिश भी पूरी करते रहे

सफर का मज़ा ले पाते

अगर थोड़ा भरोसा भी दिखा दिया होता.. 


Tuesday, 7 March 2023

सुनकर भी अन्सुना कर दिया ..

सुनकर भी अन्सुना कर दिया 

हासिल कर फिर अदा कर दिया ..

हररोज न जाने मैंने ,

किन जजबाड़ों पर पर्दा कर दिया !


उठा कर फिर रिहा 

मिला कर फिर जुदा कर दिया

हर पल न जाने मैंने 

किन उम्मीदों को अलविदा कर दिया ..


खोल कर फिर कैद कर दिया 

छेड़ कर फिर खामोश कर दिया ..

हर सिलसिले में न जाने मैंने 

किन रास्तों पर सरफ़रोश कर दिया..


महज एक पल में मैंने,

इतना कुछ शामिल कर लिया 

समझ ही न पाई की 

क्या खो दिया और क्या हासिल कर लिया!!

मत पूछो !

  मत पूछो !


मत पूछो इन हवाओं से,

उनके बहने का आलम ..

तबाही तो भीतर के तूफानों से हुई थी !!


अंजान राहों से गुजरने पर..

मत पूछो , अब "क्या लगता है डर ?"

जानकार भी अंजान जब अपने ही हो गए थे !


दुनिया ने सिखा दी, दुनियादारी 

जब अपनों ने अपनाना छोड़ दिया..

मोड़ आने से पहले ही 

अनजाने में खुद को मोड़ लिया 


उन गलियों की चाह छोड़ दी ,

उन घटाओं ने आह तोड़ दी 

जब अपनों को मनाते मनाते ..

हम ही ने रूठना छोड़ दिया !!


मत पूछो , अब "क्या लगता है डर ?"

जानकार भी अंजान जब अपने ही हो गए थे !


मत पूछो इन हवाओं से,

उनके बहने का आलम ..

तबाही तो भीतर के तूफानों से हुई थी !!