Saturday, 1 April 2023

श्वास बोलके झाले ..

 आभाळ शांत होते,

मन हलके झाले 

तुझ्या नि माझ्या एकांतात 

श्वास बोलके झाले ..


सारे निवांत होते,

वारे वाहते झाले,

म्हणता म्हणता विचारांचे..

मनात गलके झाले 


गडद रंग होते,

क्षणात फिके झाले ..

दुःखाचे जाळे फिटता

आभाळ मोकळे झाले !



ऋतू आल्हाद होते,

उन्हात चांदणे नाहले..

संसाराच्या सारीपाटावर,

नशिबाचे गोंदणे झाले !

4 comments:

  1. 😘😘👌🏻 सुंदर

    ReplyDelete
  2. Surekh 👌👌

    ReplyDelete
  3. खूप सुंदर आणि भावपूर्ण कविता👌👌

    ReplyDelete