Saturday, 5 August 2023

खिडकी ..

खिडकी ..


खिडकीत बसून गजानआड पाहताना डोळे सर्वत्र भिरभिरतात.. काय शोधात असावे ?

संध्याकाळ कलत  असताना, समोर झाडावर बसून चिवचिव करणारी पाखरं जणू

एकमेकांना काही सांगत होती ..

घरी परतण्याची घाई करत असावीत का ? वाट चुकलेल्या एखाद्याला आपली

वाट पुन्हा सापडावी तसे माझे पाय

माझ्या घरट्या कडे वळले. मन विचारात खूप बुडाले होते, वर तरंगून यायला जरा वेळ लागला.

पण मग बेमालूमपणे इतके उमलून आले, कि मग भिजायची सोया नाही राहिली !


मन किती वेडं असतं नाही? कधी व्यक्त होतं तर कधी अगदीच चिडीचूप असतं.

कोऱ्या पाटीसारखं असतं. आज त्याच पाटीवर खूप गिरवलं होतं, चिरखडलं होतं, निक्षून,


आक्रन्दून लिहिलं होतं ..

एखाद्या शांत तळ्यात खडा टाकल्यावर तरंग उठतात तसच काहीसं झाला होतं.

पावलं थांबलं आणि मनही थांबलं.

आज काही ताळमेळ बसतच नव्हता. माझंच घर मला अनोळखी वाटू लागलं होतं.

आत आल्यावर तर मला असा

भास होत होता कि भिंती, छत, खिडक्या, दारं सगळेच माझ्यावर रुसलेत, तोंड फिरवून बसलेत.


माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीत. ते सुद्धा मला हेच सांगत होते कि,

"तू स्वतः साठी कधी वेळ देणारेस?

शेवटचं मनमोकळं कधी हसली होतीस? मनासारखं कधी बोलली होतीस?"

पण मग असंही वाटून गेलं की,

आपण सारखा आपलाच विचार करतो का? आपण खूप स्वार्थी आहोत का? प्रश्नांचं काहूर माजलं होतं.

चहाची तलफ आली. बाहेर आभाळ अगदी खाली उतरून आलं होतं.

निळ्या आकाशात आता हळू हळू अंधार दाटायला सुरुवात झाली होती.

चहा करताना पुन्हा समोरच्या खिडकीतून बाहेर नजर गेली. एकदा गमतीत वाटून गेले की, बरे आहे

सगळ्या खोल्यांना खिडक्या आहेत .. त्याच्याने होते असे की बंद खोलीतून

सुद्धा मोकळ्या हवेत असल्या सारखे वाटते.

हळू हळू शांत वाटत होते, सगळा शीण ओसरून जात होतं. चहाचा घोट

घेताना ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. 


समोरच एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. खरं म्हणजे मला या बांधकामामुळे

अतिशय चिडचिड होत असे.

सततचा आवाज, गोंगाट, धूळ सगळंच नको वाटत असे. पण आज माझा त्या सगळ्याकडे

बघण्याच्या दृष्टिकोनच बदलला होता. तिथे काम करणारी माणसं, त्यांच्या बायका,

पोरं सगळे कसे मन लावून,

न थकता काम करत असतील ? आपण किती उगाच दमून जातो नई ? इतके कष्ट करून सुद्धा हसत

खेळात गाणी लावून काम करत असतात ही लोकं. खरंच किती शिकण्यासारखं आहे ह्यांच्या कडून.

आपण मानसिक ताणतणावामुळे स्वतःला इतकं कोंडून घेतला आहे की श्वास घेताना सुद्धा काहीतरी

आत तुटल्या सारखं वाटतं..

आज ही माणसं मला खूप काही शिकवून गेली. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे,

आताच्या क्षणात जगा..

अनुभवा, आनंद घ्या .. कशाला उद्याची बात ??



2 comments:

  1. Mag ghetala ka anand aaj🤗

    ReplyDelete
  2. छान आहे कविता. विचार बदलले की drushtikon👌बदलतो.

    ReplyDelete